Thursday, November 21, 2024
Homeवृत्तांत१३ जुलै २०१७ सभा वृत्त - डॉ. सौ. शोभना तीर्थळी

१३ जुलै २०१७ सभा वृत्त – डॉ. सौ. शोभना तीर्थळी

गुरुवार दिनांक १३ जुलै रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची मासिक सभा हॉटेल अश्विनी येथे पार पडली.डॉक्टर माधवी साळुंखे यांचे ‘पार्किन्सन्स आणि नैराश्य’ या विषयावर व्याख्यान झाले.
पाऊस असूनही सभेस ५०/६० सभासद उपस्थित होते.सुरुवातीला शुभंकर शुभार्थिंचे वाढदिवस साजरे करण्यात आले.शोभना तीर्थळी यांनी डॉक्टर साळुंखे यांची ओळख करून दिली.श्रोत्यांशी संवाद साधत साळुंखे यांनी व्याख्यानास सुरुवात केली.नैराश्य ( depression ) हा शब्द रोजच्या व्यवहारात आपण सहजपणे वापरत असतो.पण नैराश्य म्हणजे नेमके काय हे व्याख्यानातून त्यांनी स्पष्ट केले.

पार्किन्सन्स आणि नैराश्य याचा घनिष्ठ संबंध आहे.कंप, ताठरता इत्यादी प्रमाणे नैराश्य हेही पीडीचे एक लक्षण आहे. असे असले तरी प्रत्येकाला हे लक्षण असेलच असे नाही. टक्केवारी पाहता जास्तीतजास्त ६० टक्के असण्याची शक्यता असते.आजार वाढला, वय वाढले,दु:खद प्रसंग ,अपघातात एखादा अवयव गमावला, कर्करोग झाला, अशावेळीही नैराश्य येण्याची शक्यता वाढते.जेंव्हा शक्यता आहे असे आपण म्हणतो तेंव्हा बरे होण्याची शक्याताही आलीच. उपायच नाही असा हा आजार नाही.त्यामुळे आपण जेवढा बाऊ करतो तेवढा करायची गरज नाही.

निराश होणे ही त्या क्षणाची,दिवसाची मानसिक दृष्ट्या खालची पातळी ( लो फिलिंग ) असते. यात सातत्य राहिले,दीर्घ काळपर्यंत अशी पातळी राहिली तर नैराश्य या आजाराची अवस्था येते.त्याला सांभाळायचे कसे, हे पाहणे महत्वाचे.

नैराश्याचे क्लिनिकल आणि सायकॉलॉजिकल असे प्रकार सांगता येतील.क्लिनिकल मध्ये दु:खी होणे,आयुष्य नको वाटणे,आपली उपयुक्तता संपली असे वाटणे,अपराधीपणाची भावना वाढणे,असा लक्षणांचा समूह आढळतो.हे सातत्याने वाढत गेले, दोन आठवड्याहून जास्त काळ झाला तरी बदल होत नाही असे आढळले तर नैराश्य हा आजार झाला असे म्हणता येईल. अशावेळी मानसोपचार तज्ञाकडे जाऊन उपचार करणे आवश्यक ठरते.

सायकॉलॉजिकल डिप्रेशनमध्ये समुपदेशन,talk थेरपी,स्वमदतगटातील सहभाग इत्यादीचा उपयोग होऊ शकतो.पीडीच्या शुभार्थिना तर यासाठी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.कारण नर्व्हस सिस्टीम मध्ये ज्या प्रक्रिया होतात, त्यात असमतोल निर्माण होतो आणि त्यामुळे नैराश्याची शक्यता वाढते.ही शक्यता कमी करण्यासाठी आपल्या भावना समजून घेणे गरजेचे. व्यक्तीच्या भावनात सतत बदल होत असतात.आपल्या भावना नेमक्या काय आहेत हे स्वत:ला समजणे महत्वाचे.नैराश्य आहे आणि नाही यात जी सीमारेषा असते ती ओलांडायच्या आधीच आपल्याला लो फिलिंग असताना दु:ख,निराशा,आपण कोणाला नकोसे आहोत अश्या नेमक्या कोणत्या भावना आहेत हे समजले तर त्यावर मात करणे सोपे जाईल.यासाठी

१) आपला त्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन ‘असणारच ऐवजी शक्यता आहे’ असा असावा.

२)भावना नीट ओळखता आल्या तर उपाय करणे सोपे जाते.भावनानी आपल्याला नाचवण्यापेक्षा त्यांना आपण हाताळणे महत्वाचे.

३)नकारात्मक भावना साठवत गेल्याने एकत्र डोंगर तयार होतो.त्याला कवटाळून न बसता, ते साठू न देता ती सायकल तोडणे आपल्या हातात असते.

हे कसे करायचे?याबद्दलही डॉक्टर साळुंखे यांनी खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले.

कधी कधी लो फिलिंगला ती नेमकी कशामुळे हे न समजून घेता वरवर थांबवले जाते.त्याऐवजी मुळाशी जाऊन कशामुळे हे शोधणे महत्वाचे.यासाठी रोज स्वत:बरोबर अर्धा तास तरी राहून जळमटे कुठे साठली आहेत ते पाहुन रोजच्या रोज ती साफ करणे महत्वाचे.

आपण आपल्या भावना हाताळू शकतो का? नसेल तर इतरांची मदत घ्यावी.मोकळे व्हावे.याला talk therapy म्हणतात.यासाठी निवडलेली व्यक्ती योग्य असावी नाहीतर कौन्सिलरची मदत घ्यावी.

मी माणूस आहे त्यामुळे कधीतरी ‘ओके टू फिल नॉट ओके’.हेही स्वीकारावे.

लो फिलिंगचा काळ,वारंवारिता,तीव्रता हे वेळोवेळी तपासत राहणे महत्वाचे आहे.असे केल्याने स्वत:ला सांभाळणे शक्य होते.

प्रकृती ठीक नसतानाही डॉक्टर साळुंखे यांनी जवळ जवळ दीड दोन तास व्याख्यान सुरु असताना आणि व्याख्यान झाल्यावर विचारल्या गेलेल्या शंका,प्रश्नांना सोपी उदाहरणे देत उत्तरे दिली.

सभा संपल्यावरही त्यांच्याभोवती शंका विचारण्यासाठी शुभंकर,शुभार्थी उभे होते.अनेकांना नैराश्य उंबरठ्यावर असताना त्याला परतवायचे कसे हे समजल्याने समाधान वाटत होते.सभेनंतर शुभार्थिच्या आलेल्या फोनवरूनही हे लक्षात आले.

वाढदिवसानिमित्त जोत्स्ना पुजारी यांनी केक आणि वेफर्स, हेमा शिरोडकर यांनी बिस्किटे दिली.दीपा होनप यांनी आपली मुलगी तन्वी हिने पीएचडी मिळवल्याबद्दल पेढे दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क