ठाणे येथील प्रसिध्द आय.पी.एच. मानसिक आरोग्य संस्थेची पुणे येथे शाखा सुरु झाली आहे.ठाण्याप्रमाणे पुण्यातही विविध स्वमदतगटांना एका छताखाली आणून आरोग्य चळवळ वृद्धिंगत करण्याचा संस्थेचा विचार आहे.प्रत्येक स्वमदतगटाचे स्वत:चे कार्य एकीकडे चालू राहील. याशिवाय आय.पी.एच.महिन्यातून एकदा प्रत्येक संस्थेला त्यांची जागा सभेसाठी देईल.
दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी पार्किन्सन्स मंडळाची सभा नर्मदा हॉल येथे भरते.ती नेहमीप्रमाणे असेलच याशिवाय
आता दर महिन्याच्या चवथ्या सोमवारी आय.पी.एच.च्या जागेत सभा भरणार आहे. प्रतिसाद पाहून पुढे चालू ठेवण्यात येईल
या महिन्याची सभा सोमवार दिनांक २३ एप्रिलला असेल.यावेळी अनुभवांची देवाण घेवाण आणि शरच्चंद्र पटवर्धन यांचे विशेष मार्गदर्शन असेल.
वेळ दु.४ ते ६
ठिकाण
अनैषा,प्लॉट क्रमांक ४,यशश्री कॉलनी,वेदांत नगरीजवळ,डी.पी.रोड,कर्वेनगर ,पुणे
खुणेसाठी – राजाराम पुलाकडून कमिन्स कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदणी हॉटेलच्या समोरची गल्ली.