पार्किन्सन्स मित्रमंडळ आय.पी.एच.,पुणे येथे या महिन्याची सभा सोमवार दिनांक २५ जून रोजी आयोजित केली होती.. यावेळी हृषीकेश पवार यांची ‘Dance for Parkinson’s Disease ‘ ही डॉक्युमेंटरी दाखवली गेली.प्रकाश जोशी यांनी आपला Laptop आणून सहकार्य केल्याने आणि IPH च्या कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक सहकार्यामुळे डॉक्युमेंटरी दाखवणे शक्य झाले.पाऊस असूनही १७ जण उपस्थित होते.डॉक्युमेंटरीमध्ये शुभंकर, शुभार्थींचे नृत्योपचाराचे अनुभव,रामचंद्र करमरकर यांनी नृत्योपचाराची सुरुवात कशी झाली ही माहिती,न्यूरॉलॉजिस्ट राजस देशपांडे यांचे तज्ज्ञ म्हणून याबाबतचे विचार,हृषीकेश पवार,मैथिली भूपटकर या शिक्षकांचे अनुभव यांचा समावेश आहे.मंडळाच्या www.parkinsonsmitra.org या वेबसाईटवर या डॉक्युमेंटरीची लिंक आहे. ती अवश्य पहावी.
शरच्चंद्र पटवर्धन म्हणाले, त्याच हालचाली पुन्हा पुन्हा केल्याने त्या सुधारतात.क्षमता वाढते.व्यायामातही हे होते. यासाठी त्यांनी काही प्रात्यक्षिके करून दाखवली. एकत्र व्यायाम केल्याने अधिक फायदा होतो असेही ते म्हणाले.आता विषयाला वेगळे वळण लागले.अनुभव कथन सुरु झाले.
डॉक्टर जावडेकर यांनी आपल्या भारतीय जीवन पद्धतीत अनेक अवयवांना आपोआप व्यायाम होत असे. पाश्चात्य जीवन पद्धती अनुसरायला सुरुवात केल्यापासून हे कमी झाले असे मत व्यक्त केले.’ डॉक्टर कसा निवडावा ‘ हे आपल्या आगामी पुस्तकातील प्रकरण वाचून दाखवले.आपला आनंद कशात आहे तो शोधावा.त्यांनी स्वत: पेंटीगमध्ये तो शोधला. नव्यानेच शिकूनही दोन वर्षात ५०० पेंटिंग केली.रोज आपण कितीवेळा निराश झालो,कितीवेळा आनंदी होतो, याचे स्वत:चेच निरीक्षण करून,ग्रेड देवून मुल्यांकन करावे. .नैराश्याचे पारडे वर वाटल्यास कार्टून पाहणे,हास्योपचार,प्राणायाम,ना
दिल्लीस्थित असलेल्या रेखा देशमुख यांनी दिल्लीतून पुण्यात आल्यावर आपल्याला असा डॉक्टर शोधणे कठीण जात असल्याचे मत नोंदवले.
आता सहा वाजत आले होते.गट छोटा असल्याने प्रत्येकजण व्यक्त होत होता..शेवटी मिटिंग आटोपती घ्यावी लागली.
या सभेच्या अनुभवातून जवळ राहणाऱ्यांनी छोटे गट करून अनुभवांची देवाणघेवाण करणे शुभंकर शुभार्थीसाठी उपयुक्त आहे हे लक्षात आले.