दिवाळीच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा.
सोमवार दि.१२ नोव्हेंबर रोजी या महिन्यातील मंडळाची सभा असणार नाही.याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी.या महिन्यात सहल जाणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर्षीची पार्किन्सन्स मित्रमंडळाची सहल बुधवार २१ नोव्हेंबर रोजी घाडगे फार्म येथे जाणार आहे.हे निसर्गरम्य ठिकाण पुण्यापासून २३ किलोमीटरवर सिंहगड रोडवर आहे.सहल सकाळी जावून संध्यकाळी परत येईल.ऑक्टोबरच्या सभेत अनेकांनी सहलीचे पैसे भरले आहेत.त्याना सहलीबाबत सविस्तर माहिती वेळेत कळवली जाईल.
ज्यांना सहलीला यायचे आहे ते अजूनही १४ नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदवू शकतात.प्रत्येकी रु.४०० भरावयाचे आहेत.काही जागा शिल्लक आहेत.आपण पार्किन्सन्स मित्रमंडळ या नावाने बँकऑफ महाराष्ट्र Ac no. 60293752005 IFSC MAHB0000330 या नंबरवर आपल्या जवळच्या कोणत्याही बँकेत पैसे भरू शकता.पैसे भरल्याचे विजयालक्ष्मी रेवणकर ९८५०८४९५२९ किंवा सविता ढमढेरे ९३७१०००४३८ याना फोन करून कळवावे.
सहलीबद्दल काही शंका असल्यास येथे संपर्क साधावा.
शोभना तीर्थळी ९६५७७८४१९८
वसुमती देसाई ९८६००६७८०८