आनंदाचीही लागण होते. मी सारसबागेत जाण्याचा अनुभव सांगितल्यावर अनेकांना आपणही जावे असे वाटले.शुभार्थींचे अनुकरणीय अनुभव म्हणूनच गप्पात सांगावेसे वाटतात.शुभार्थी डॉक्टर प्रकाश जावडेकर हे प्रत्येक शेअरिंगमध्ये, सहलीत त्यांचे स्वत:वर केलेले नवनवीन प्रयोग सांगत असतात.बालरोगतज्ज्ञ म्हणून त्यांनी भारतात आणि भारताबाहेरही काम केले आहे.
इतर शुभार्थींच्या पार्किन्सन्सच्या लक्षणात वाढ होते. जावडेकर यांच्याबाबत मात्र स्वत:च्या पीडीबाबतची समज वाढत आहे.आणि त्यावर त्यांनी शोधलेल्या उपायांमुळे,स्वत:वर केलेल्या प्रयोगांमुळे लक्षणे कमी होत आहेत.
एक उदाहरण सांगायचे तर त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या व्हिडीओत त्यांच्या हाताचा कंप ठळकपणे दिसतो पण आत्ता कंप राहिला नाही. याचे कारण ‘मी माझा आजार एन्जॉय करतो’ असे ते सांगतात..इतर अनेक आजारांपेक्षा पीडी सुखावह आहे असा विचार करतात.हे सहज शक्य नाही.आनंदी राहण्यासाठी ते उपायही शोधतात.अमलात आणतात.
त्यांनी एक छान उपाय सांगितला.तो शुभार्थीलाच नाही तर प्रत्येकासाठीच महत्वाचा आहे.रोज आपण कितीवेळा निराश झालो,कितीवेळा आनंदी होतो, याचे स्वत:चेच निरीक्षण करून,ग्रेड देवून मुल्यांकन करावे. .नैराश्याचे पारडे वर वाटल्यास कार्टून पाहणे,हास्योपचार,प्राणायाम,नातेवाईक, मित्रमंडळींना भेटणे,छंदावर लक्ष केंद्रित करणे. असे विविध मार्ग शोधता येतील.आपला आनंद आपणच शोधावा.
त्यांनी स्वत: पेंटीगमध्ये आणि अनेक गोष्टीत तो शोधला. नव्यानेच शिकूनही दोन वर्षात ५०० पेंटिंग केली.अजूनही करत आहेत. ते फेसबुक,Whatsapp वर ती टाकतात तेंव्हा थक्क व्हायला होते.इतरांना यातून प्रेरणा मिळते.सर्व कौतुक करतात त्यामुळे जावडेकर यांचाही उत्साह वाढतो.त्यांच्या चित्रकला शिक्षकांनी त्याना सुचविले,दिल्लीहून एक पत्र आले आहे त्यानुसार १२००० ऐतिहासिक वारसा असलेली स्मारके ( monuments )निवडलेली आहेत त्यातील एकाचा फोटो निवडून त्याचे पेंटिंग करायचे.जावडेकर त्यांनी १८०० वर्षापूर्वीचे अंबरनाथचे शिवमंदिर निवडले.त्यांनी काढलेले चित्र पाहून शिक्षिकाही थक्क झाल्या.जावडेकर यांना निद्रानाशाचा त्रास आहे अडीच तीन वाजता जाग येते त्याबद्दल कुरकुर न करता त्यावेळात त्यांनी हे चित्र काढले. १० दिवसात तयारही झाले आणि त्यांच्या पेंटिंगची निवड झाली.
त्यांचे ‘डॉक्टर होणे एक आव्हान’ हे पुस्तक प्रकाशित झाले. दुसरेही होण्याच्या मार्गावर आहे.
व्यायामालाही ते महत्व देतात. आपल्या भारतीय जीवन पद्धतीत अनेक अवयवांना आपोआप व्यायाम होत असे. पाश्चात्य जीवन पद्धती अनुसरायला सुरुवात केल्यापासून हे कमी झाले असे त्यांना वाटते..प्रत्येकांनी आपल्या विविध शंकांना प्रेमानी उत्तर देईल असा जनरल Practitioner डॉक्टर शोधावा ते सुचवितात..
याशिवाय संगणकावर चेस खेळणे, कपडे धुणे लिखाण,स्वयंपाक,प्रवास विविध तऱ्हेचे क्राफ्ट ते करतात.या सर्वातून मेंदूला आनंदाचे पंपिंग सातत्याने होत राहते.यामुळे लक्षणावरही मात होते.काहीतरी फनी करत राहा असे ते सांगतात.स्वत: डॉक्टर असल्याने आणि अनुभवाचे बोल बोलत असल्याने त्यांच्या सांगण्याला महत्व आहे.आपल्या परिवारात अशी व्यक्ती आहे ही अभिमानाची गोष्ट आहे.
अशा या हरहुन्नरी व्यक्तीला शब्दात पकडणे तसे कठीणच.येथे पार्किन्सन्सच्या आजाराला त्यांनी कसे हाताळले. हे सांगणे इतकाच मर्यादित उद्देश आहे.