Sunday, October 6, 2024
Homeये हृदयीचे ते हृदयीये हृदयीचे ते हृदयी – ६ – थोडेसे बदलायला काय हरकत आहे...

ये हृदयीचे ते हृदयी – ६ – थोडेसे बदलायला काय हरकत आहे ! – अंजली महाजन

माणूस हा समाज प्रिय प्राणी आहे.तो जन्मापासून ते मृत्यूपर्यंत इतरांच्या सहवासात राहून आपले जीवन व्यतीत करीत असतो .त्याने जरी ठरवले तरी तो फार काळ एकटा नाही राहू शकत ‌. समाजात जीवन जगताना त्याला बऱ्याच वेळेला तडजोड करावी लागते .जर त्याने तडजोड करायचीच नाही असे ठरवले तर तो आपले जीवन यशस्वी पणे जगू शकणार नाही.माणसाला जीवन जगताना अनेक प्रसंगी माघार घेऊन तडजोड करावी लागते . जीवनात केलेली तडजोड म्हणजे आपला पराभव असतो असे मुळीच समजू नये.
आयुष्य खूप सुंदर आहे त्याचा उपभोग घेण्यासाठी वेळ प्रसंगी तडजोड करावी लागते आपल्याला बदलावे लागते.थोडेसे बदलायला काय हरकत आहे ?
साधारण ६० व्या वर्षी माणूस संसारातील विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या की,थोडा मोकळा होतो त्याच वेळी त्याने स्वतः ला विविध छंदात,कामात गुंतवून ठेवले नाही तर अधिकाधिक वेळ त्याचा हा घरात जातो आणि मग नको त्या गोष्टींचा विचार करून तो घरातल्या गोष्टीत अधिक लक्ष घालतो.
काही कुटुंबातील सदस्यांना वडिलधाऱ्या मंडळींचा घरात हस्तक्षेप चालतो पण काही कुटुंबातील लोकांना मोठ्या मंडळींची त्यांच्या संसारात केलेली लुडबुड अजिबात चालत नाही. जेथे ज्येष्ठ लोकांना लहानांकडून आदराची वागणूक दिली जाते त्यांनी जरूर तेथे सहभागी होऊन आनंद उपभोगावा.
पण ज्यांना आदराची वागणूक दिली जात नाही त्या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या स्वभावाला मुरड घालावी.आपल्या अपेक्षा हळूहळू कमी कराव्यात.
त्या व्यक्ती ने दुसऱ्यांना बदलण्या ऐवजी स्वतः मध्ये बदल घडवायला सुरुवात करावी.आपण आपल्या कुटुंबातील सदस्यांना आपले म्हणणे पटवून देण्या ऐवजी त्यांचे म्हणणे थोड्याफार प्रमाणात पटवून घ्यायला शिकले पाहिजे.
आपल्याला फक्त आपले मित्र निरखून,ताऊन सुलाखून निवडता येतात पण नातलग नाही, त्यामुळे घरात येणाऱ्या सुना,जावयी, व्याही मंडळी यांचे स्वभावात जरी काही दोष असले तरी आपण स्वतः बदलून समोरचे लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारले पाहिजे आणि जीवन व्यवहार चालू ठेवले पाहिजेत . ऊठसूठ एकमेकांना दोष देत कलह करण्यात काही अर्थ नाही.
प्रत्येक माणसाचा स्वभाव वेगळा असतो, विचार करण्याची पद्धत वेगळी असते, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो हे प्रत्येकाने लक्षात घेऊन वागले पाहिजे.प्रत्येक वेळी आपणच फार शहाणे असल्याचा आविर्भाव माणसाने कमी केला पाहिजे.
सतत एकमेकांना दोष देऊन,राग राग करून, एकमेकांचा तिरस्कार करून काही च हाती लागत नाही व काहीच साध्य होत नाही.कारण जग फक्त प्रेमानेच जिंकता येते.म्हणून कोणत्याही व्यक्तीला गुणदोषांसकट स्विकारले पाहिजे.
‌माणसाने काळानुसार बदल स्विकारून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आपल्याला जे वैभव, सुख, समाधान, प्राप्त झाले आहे त्यात आनंद मानून तक्रारी करण बंद केलं पाहिजे.सून,मुलगा,लेख,जावयी, नातवंडे,यांच्या चांगल्या वागणूकीची चर्चा केली पाहिजे.व त्यांच्या तक्रारींचा सुरू कमी केला पाहिजे.
ज्येष्ठ नागरिकांवर जर सुनामुलांनी जबाबदारी टाकली तर ज्येष्ठांनी ती झेपत असेल तर जरूर घ्यावी . जबाबदारी घेतल्याशिवाय आपली कुवत कळत नाही.घेतलेल्या जबाबदारी तून चुका जरी झाल्या तरी त्यातून खूप गोष्टी शिकायला मिळतात.
पण चुकांचे खापर मात्र इतरांवर फोडणे योग्य नाही हे लक्षात घेऊन वागले पाहिजे. आपली तुलना आपल्या बरोबरीच्या मित्रांशी करणे टाळले पाहिजे . प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती सामाजिक, आर्थिकदृष्ट्या,वेगळी असते तेव्हा त्याच्यावर जळण्यापेक्षा आपल्याकडे अधिक काय चांगले आहे याचा शोध घेतला पाहिजे व आनंद मानला पाहिजे.
तरूण पणी जरी आपला स्वभाव रागिष्ट,कोपिष्ट, संतापी असला तरी आता चार उन्हाळे पावसाळे बघितल्यावर रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते व समजूतदार पणे वागणे हितावह असते.
सर्वांना आपले मानले पाहिजे.त्यांना भेटण्यासाठी ओढ लागली पाहिजे.भेटल्यानंतर चार सुखदुःखाच्या गोष्टी बोलण्याची ओढ,त्याच्या ही चार सुखदुःखाच्या गोष्टी ऐकण्याची ओढ लागली पाहिजे
काही कारणास्तव आपल्या कुटुंबातील सदस्यांपासून दूर राहण्याचा निर्णय शक्यतो घेऊ नये,पण निर्णय घेतल्यानंतर चंचलपणे न वागता घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने शक्यतो उभे राहिले पाहिजे.सारखे निर्णय बदलू नयेत.
आपण आपल्या वार्धक्यात आपल्या शरीराची काळजी घ्यावी.पचेल तेच खावे ,जागरण कमी करावे, नियमित व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी आपले शरीर,आपले आरोग्य या गोष्टी जगामध्ये सर्वाधिक अनमोल आहेत.तारूण्यात रात्रंदिवस मेहनत करून कितीही पैसा कमावला आणि त्याची म्हातारपणात साठी पुंजी करुन ठेवली पण त्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी शरीर धडधाकट असणं आवश्यक आहे .पैसा भरपूर आहे पण चांगले आरोग्य नसेल तर त्या पैशांचे आपण वाॅचमन होतो.
‌असं म्हणतात “शरीर ओके तरच आपले ठिकाणावर डोके ” आपल्याला वडिलांचे नाव हे वारसा हक्काने मिळू शकते पण आई कडून शरीर मिळाल्यानंतर त्याची निगा आपल्यालाच राखावी लागते . चांगले आरोग्य हे आपल्यालाच कमवावे लागते.ते वारसाहक्काने मिळत नाही.
तेव्हा सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करावा स्वतःत बदल घडवून आणावेत, जीवन शैली बदलल्या मुळे प्रत्येक कुटुंबात थोडेफार ताणतणाव असतात. आपण थोडं बदललं पाहिजे.घरातले वातावरण जर आपण बदलल्याने पोषक होणार असेल तर थोडे बदलायला काय हरकत आहे.वादविवाद करून, भांडणतंटे करून ताणतणाव वाढवून आजारी पडून मेडिकल खर्चात वाढ करण्यापेक्षा आपणच थोड बदललं तर नक्कीच फायदेशीर ठरते.
बघा विचार करा,लोक काय म्हणतील ! नातलग काय म्हणतील,या भीतीपायी आपण आपला इगो सोडून द्यायला तयार नसतो . त्यामुळे सुखी समाधानी जीवना ला पारखे होतो.
म्हणून म्हणते “थोडं बदलायला काय हरकत आहे ?


लेखिका
अंजली महाजन
२६ ऑक्टोबर २०२१

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क