साधारण मे च्या शेवटच्या आठवड्यात सुप्रिया बर्वे यांचा फोन आला त्यांचा पार्किन्सन्स अचानक वाढल्या सारखा वाटत होता.कंप वाढला होता. चक्कर येत होती त्यांनी न्युरालाजिस्टचा आधीच फोनवर सल्ला घेतला होता. त्यांनी सींडोपाची एक गोळी वाढवून दिली होती आणि आता त्या दोन गोळ्या एकदम घेत होत्या तरी त्यांची चक्कर थांबत नव्हती असे त्या म्हणत होत्या. ब्रेकफास्ट नंतर आणि जेवणानंतर गोळ्या घेते असेही त्या सांगत होत्या. मी त्यांना चक्कर संदर्भात फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले पण त्या नुकतीच आधीची जागा बदलून दुसऱ्या ठिकाणी राहायला आल्यामुळे त्यांना येथे जवळ कोणी डॉक्टर माहिती नव्हते. करोनामुळे बाहेर जाणे त्यांना नको वाटत होते.मी त्यांना करोना विषयी भीती वाटते का असे विचारले. त्या म्हणाल्या, ‘नाही मी चक्कर येऊन पडले तर बर्वेंना मला हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल हे त्रासदायक होईल याची मला भीती वाटते’ बर्वे त्यांना कामात मदत करत होते त्यामुळे कामवाल्या नव्हत्या तरी त्यांना काही समस्या नव्हती.माझ्याशी बोलल्यावर त्यांना थोडे बरे वाटले. दोन दिवसांनी त्यांचा बरे वाटत असल्याचे सांगणारा फोन आला. त्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन झाल्या. सुप्रिया ताईंच्या निमित्त्याने मला अत्यंत प्राथमिक असलेल्या अशा काही गोष्टी सर्वांच्या निदर्शनास आणाव्यात असे वाटते.
मी काही डॉक्टर नाही पण अनुभवातून जी माहिती आहे त्यावरून मी सुप्रिया ताईंना सांगितले होते की सींडोपा घेतल्याने चक्कर थांबणार नाही. डोपामीन कमी झाल्याने हालचालीवर परिणाम झालेला असतो त्यावरच सींडोपा काम करते. चक्कर, बद्धकोष्टता, झोप न येणे, नैराश्य अशा non motor सिम्प्टम्स वर काम करत नाही.बर्याचवेळा कंप खुप टेन्शन आलं,इतर काही आजार,झाले,धक्कादायक बातमी अचानक समजली तरी वाढतात असे अनेक शुभार्थींबाबत आढळते.त्यामुळे एक दोन दिवस वाट पहा असेही मी त्यांना सांगितले.
जयश्री ताईंची चक्कर झोपल्यावर कमी होत होती. मी त्यांना म्हणले चक्कर अनेक कारणाने येते. झोप झाली नसेल, ऍसिडिटी वाढली असेल, ब्लडप्रेशर वाढले असेल अर्थात हे सर्व माझे स्वतःचे चक्कर येण्या बाबतीतले अनुभव, त्यावरून मी सांगत होते. येथे आणखीन एक गोष्ट नमूद करावीशी वाटते चक्कर आल्यावर सर्वसाधारणपणे स्टेमेटीलची गोळी दिली जाते. पार्किन्सन्स असणार्यांनी ती घेऊ नये असे न्युरालाजिस्ट सुधीर कोठारी यांनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले होते. तेव्हापासून इतर आजारावरचा कोणत्याही गोळ्या न्युरालॉजीस्टना विचारूनच घ्यायला हव्यात हे आमच्या बाबतीत आम्ही पाळतो. सर्वांनी हे लक्षात घ्यावे असे मला वाटते.
गोळ्यांचा डोस आणि त्या केव्हा घ्यायच्या हेही महत्त्वाचे. सुप्रियाताई दोन गोळ्या एकदम घेत होत्या. डॉक्टरना याबाबत नीट विचारून गोळ्यांच्या वेळा आणि आणि डोस सांभाळायला हवा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सींडोपा उपाशीपोटी घेणे चांगले म्हणजे त्याचा चांगला परिणाम होतो. दिवसभरातील डोस घेताना जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवणानंतर दोन तासांनी सिंडोपा घ्यावी. सुप्रियाताई नेमक्या ब्रेकफास्ट नंतर आणि जेवणानंतर गोळ्या घेत होत्या आम्ही घर भेटीला जायचो तेव्हां बरेच जण आम्हाला आम्ही दुधाबरोबर गोळ्या घेतो असे सांगायचे पण हे चुकीचे आहे. मागच्या वर्षी चारुशीला सांखला यांचे जागतिक पार्किन्सन्स मेळाव्यात व्याख्यान झाले त्यावेळी त्यांनी याचे कारण सांगितले. सींडोपातील डोपा हे Amino acid
आहे. ते चिकन, दूध, पनीर अशा प्रोटीन असलेल्या पदार्था बरोबर घेऊ नये कारण त्याचे Absorption होत नाही आणि सिंडोपा चा उपयोग होत नाही. प्रोटीन हे Absorption होण्यासाठी स्पर्धा करते आणि सिंडोपाला मागे टाकते.
डॉक्टर सांखला यांच्या व्याख्यानात अशा अनेक उपयुक्त व व्यावहारिक सूचना आहेत. यावर्षी वेबसाइटवर प्रसिद्ध होणार्या स्मरणिकेत त्यांच्या व्याख्यानाचे शब्दांकन केले आहे युट्युब वरील त्यांच्या व्हिडिओची लिंक आपल्याला वेबसाईटवर पहावयास मिळेल हे आवर्जून पहावे.अगदी छोट्या वाटणार्या गोष्टींनेही खुप फरक पडतो.
पार्किन्सन्सविषयक गप्पा – ५८ – शोभनाताई
RELATED ARTICLES