मैत्री प्रथम स्वतःशी करा, स्वतःच्या गुणांशी करा, आपल्या स्वतःच्या अस्तित्वाशी करा, मैत्री स्वतःच्या अंतर्मनाशी करा, मैत्री स्वतःच्या आरोग्याशी करा, माझे सुंदर आनंदी उत्साही अस्तित्व अखंडितपणे मलाच प्रथम जपायचे आहे या जाणिवेशी करा. मैत्री जीवनामधील चैतन्याशी करा, मैत्री स्वरूपाशी अन् स्वानंदाशी करा. मैत्री स्व:ताच्या मनातील सुंदर विचारांशी सुसंवाद साधून करा.मैत्री सर्व नात्यांशी करा, मैत्री हळुवार भावनांशी करा, मैत्री उगवत्या तेजोमय सूर्याशी करा, मैत्री आनंद पसरवणाऱ्या टिपूर चांदण्याशी करा, मैत्री खळखळणाऱ्या अन् सर्वस्व झोकून वाहणाऱ्या प्रपाताशी करा, मैत्री आपल्या उत्कट भव्य ध्येयाशी करा, मैत्री हिमालयासारख्या उत्तुंग मूल्यांशी करा, मैत्री अनंत हस्ते भरभरून देणाऱ्या निसर्गाशी करा, मैत्री पर्यावरणाशी करा, मैत्री सामाजिक बांधिलकीशी करा, मैत्री आपले मन मोकळे करणाऱ्या सुहृदांशी करा, मैत्री ध्येयवेड्या सकारात्मक व्यक्तीमत्वांशी करा, मैत्री श्रीकृष्णासारखी करा.