Thursday, November 7, 2024
Homeमनोगतआठवणी निर्माल्य होताना...- किरण सरदेशपांडे

आठवणी निर्माल्य होताना…- किरण सरदेशपांडे

पूर आला , पाणी चढल , पाणी उतरलं..बोलायला , वाचायला वाटत पण इतकं सोपं नसत सगळं !
ज्यांच्या उंबऱ्याला वगैरे पाणी लागत त्यांना याची दाहकता समजते. महापूर म्हणजे काही स्टेटस वर ” ओ शेठ ” गाणं टाकून मिरवायची गोष्ट तर मुळीच नाहीये.
पै पै जोडून उभा केलेला संसार अचानक भिजून जाणं , कुजून जाणं नसत पचायला सोपं ! अगदी प्राणप्रिय म्हणून जपून ठेवलेली एखादी वस्तू , गोष्ट पुराच्या पाण्यात कुजून जाते , संपते अक्षरशः.. त्या गोष्टी सोबत कितीतरी आठवणी जोडलेल्या असतात , त्या इतक्या सहजपणे विसर्जित होतात ?
एखाद्या सासुरवाशिणीचा तिच्या लग्नात माहेरून आलेला लाकडी पाट असतो , बाईने आयुष्यभर जपलेला एखादा साधा तांब्या असतो , कोणाच्या पिढ्यान् पिढ्यांकडून वारश्यात आलेला देव्हाऱ्यातला बाळकृष्ण असतो , कुणाची आयुष्यभर खजिन्यासारखी जपून ठेवलेली पुस्तक असतात तर कधी अगदी ज्यांनी नेहमी आधार दिला त्या मातीच्या मायाळू भिंती आणि ऊन वाऱ्यात सावली देणार साधं छप्पर अगदी पडुन , वाहून , विरून जातं आणि त्यांच्या आठवणीत सुद्धा रमायला धास्ती वाटते कारण पुढच्या ओल्या संसाराकडे पाहता अजून किती काय काय उभं करायचंय याचे हिशोब मन मांडत राहत !
घरात पुराच पाणी खेळून गेल्यावर जेंव्हा घरात पाऊल ठेवतो ; तेंव्हा उरलेल्या गाळात भिजलेल्या संसाराची लक्तरं दिसत असतात. आणि येणाऱ्या मदतीने भौतिक गरजा भागल्या तरी काळजाला पडलेली घरं लिंपायला तो नदीचा रवाळ , दुर्गंधीयुक्त , संसारावर काजळीसारखा पसरलेला गाळ नाही कामी येत !
रोज ५-६ लिटर भर दूध देणार दुभतं जनावर जेंव्हा पुराच्या पाण्यात तसच सोडावं लागतं , तेंव्हा अगदी चहाच्या प्रत्येक घोटात लागणाऱ्या दुधाच्या चवीनं सुद्धा भडभडून येत ! नदीला माय म्हणतो आपण ; करतो तिची पूजा पण आईचा राग संसारच पुसून टाकतो , त्याचं काय?
शेवटी माणूस यातून सुद्धा राहतो उभा.. गाळातून घसरणारे पाय सावरत , बियाणांची भिजून फुगलेली पोती सोडत , मातीने भरलेली पातेली – हंडे – घागरी – बादल्या – तांबे – फुलपात्र – वाट्या – पळ्या सगळं घासून घासून धुवून काढत , उगाच एखाद्या सांदीतून अचानक निघणाऱ्या साप किरडाला घाबरत घाबरत ; पण करतो तो संसार उभा .
पण नंतर एखाद्या सामान्य दिवशी एखाद्या आयुष्यभर जपलेल्या पण पुरत वाहून गेलेल्या गोष्टीची आठवण काढून उगाच हळहळत असतो , महापुराच्या मानसिक गटांगळ्या जास्त त्रास देतात !
😞😔याला जोडून चिपळूण….

  • स्वतः चे 35 ते 40 लाखांचे नुकसान झाले असताना आजूबाजूच्या 25 कुटुंबात प्रत्येकी 5000रु वाटणारा व्यावसायिक
    *पुराचा तडाखा न बसलेल्या भागातून या व्यावसायिकाच्या मित्राने 9 मजूर जेवणाच्या रसदीसह साफसफाई साठी पाठवले
  • चौकात उभे राहून, मदत घेऊन येणार्‍या ट्रक मधील मालावर गरज नसताना डल्ला मारणारे दरोडेखोर
  • मंत्री, व्हीआयपी येणार म्हणून त्यांनी बघायला घाण असावी यासाठी सफाई रोखणारे प्रशासन
    *बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांच्या हालांकडे दुर्लक्ष, पिण्याच्या पाण्याचे वांधे
    *येणारी मदत नीट वाटण्याची स्वयंसेवी संस्थांची यंत्रणा नाही
    *मदत नको पण वांझ दौरे थांबवा
    निधी गोळा करणाऱ्यांचीही पात्रता लायकी इतिहास लक्षात घ्यायला हवा
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क