शनिवार दिनांक १३ – २ – १६ रोजी पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली आहे.यावेळी तिळगुळ समारंभ होणार आहे. शुभंकर आणि शुभार्थी यांच्या परस्पर अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण ( sharing ) होणार आहे.यासाठी यावेळी ‘पार्किन्सन्ससह जगताना जगण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी,लक्षणावर मात करण्यासाठी,आनंदी राहण्यासाठी शुभार्थीना कोणाची आणि कशी मदत होते, याबाबतचे अनुभव सांगायचे आहेत.यात कुटुंबीय,शेजारी,डॉक्टर,मित्रमंडळ,नृत्योपाचारक असे विविध शुभंकर असतील. बरेच शुभार्थी कोणाच्याही मदतीशिवाय पीडीशी समायोजन करतात.जो काही आपला अनुभव असेल तो निसंकोचपाणे सांगण्यासाठी, शुभंकराबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पार्किन्सन्स मित्रमंडळ हे एक व्यासपीठ आहे.सभेला उपस्थीत राहू न शकणार्या शुभार्थिनी अनुभव लिहून पाठवले तरी चालतील.ते स्मरणिका किंवा संचारच्या अंकात ते दिले जातील.
लालबहाद्दूर शास्त्री रोड,पुणे३०
वेळ : दु ४ वाजता