Friday, October 4, 2024
Homeवृत्तांत१३ फेब्रुवारी १६ सभेचा वृत्तांत

१३ फेब्रुवारी १६ सभेचा वृत्तांत

 

 

                             शनिवार दिनांक १३ – २ – १६ रोजी हॉटेल अश्विनी येथे पार्किन्सन्स मित्रमंडळाची सभा आयोजित केली होती.. शुभंकर आणि शुभार्थी यांच्या परस्पर अनुभव आणि विचारांची देवाणघेवाण ( sharing ) असा कार्यक्रम झाला.यावेळी ‘पार्किन्सन्ससह जगताना जगण्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी,लक्षणावर मात करण्यासाठी,आनंदी राहण्यासाठी शुभार्थीना कोणाची आणि कशी मदत होते, याबाबतचे अनुभव सांगायचे होते,कृतज्ञता व्यक्त करायची होती,.सभेस ३५ ते ४० सभासद उपस्थित होते.प्रार्थनेने सभेस सुरुवात झाली.यानंतर आशा रेवणकर यांनी भारती विद्यापीठातील Palliative care वर झालेल्या इंटरनॅशनल सेमिनारच्या सहभागाबद्दल माहिती सांगितली. त्या, शरच्चंद्र पटवर्धन,रामचंद्र करमरकर यांच्यासह या सेमिनार मध्ये सहभागी झाल्या होत्या.या अनुभवाबरोबर शुभंकर म्हणून अनुभवही सांगितले.पतीचा पीडी हाताळण्यात आणि मानसिक आधारासाठी पार्किन्सन्स मित्रमंडळाचा आधार वाटत असल्याचे मत व्यक्त केले.शरच्चंद्र पटवर्धन यांनीही आपले सेमिनारविषयी अनुभव सांगितले.
यानंतर शोभना तीर्थळी यांनी शेअरिंगसाठी असा विषय ठेवण्यामागची भूमिका सांगितली.आपण सकारात्मक विचार करा असे नेहमी सांगतो पण त्यासाठी काय करायचे असा प्रश्न असतो. कृतज्ञता व्यक्त करणे हा सकारात्मकतेकडे.नेण्याचा मार्ग आहे मानसोपचार तज्ज्ञही हे सांगत असतात.सकारात्मकतेकडे जाण्याच्या विविध वाटा दाखवणार्‍या ‘ बी +Ve सकारात्मक विचार ……प्रवास पुर्णत्वाकडे’ ‘ या पुस्तकाबाबत श्री. करमरकर यांनी  माहिती सांगितली.
जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील शुभंकर आणि शुभार्थींचे वाढदिवस नेहमीप्रमाणे हास्याचा फुगा फोडून आणि अंजलीने स्वहस्ताने केलेली भेटकार्डे देऊन साजरे करण्यात आले.
यानंतर शुभार्थींनी आपले अनुभव सांगण्यास आणि कृतज्ञता व्यक्त करण्यास सुरुवात झाली.
आर्किटेक्ट असलेल्या चंद्रकांत दीवाणेनी पत्नी व मुलाच्या सहकार्याने १५ वर्षे पीडीला सहन करत असल्याचे,कार्यरत राहिल्याचे श्रेय दिले. त्यांच्याबरोबर आलेल्या मुलाने मात्र त्यांची  इच्छा शक्ती महत्वाची असल्याचे सांगितले.
९३ वर्षांचे  शुभार्थी कलबाग यांची ओपन हार्ट सर्जरी झाली आहे.त्यांच्या पत्नीला पीडी होता त्या २००४ साली निवर्तल्या.मुले परदेशी.आणि हे एकटेच राहतात.दैनंदिन व्यवहार,आजारपण.होस्पिटलायझेशन यात त्याना कोठेच अडचण येत नाही.त्यांचे सिनिअर सिटीझन गटातील सहकारी,जोडलेली माणसे त्याना मदत करतात.
परभणीचे श्री सोमाणी मंडळाच्या सभांना मुद्दाम हजर राहतात.परभणीला त्याना पिडीबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती.मंडळात सामील झाल्यावर मात्र पीडीबाबतची भीती कमी झाली.मंडळाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मोरेश्वर काशीकर हे स्वत:ची कामे स्वत: करतात.त्यांच्या कुटुंबीयांनी त्याना अजून पीडी पेशंट म्हणून स्वीकारलेच नव्हते.आता त्याना थोडा वळताना फ्रीजिंगचा त्रास होतो. निर्णय क्षमता थोडी कमी झाली असे वाटते.पण योगाच्या सहायाने त्यावर मात करू पाहतात.स्वत:च स्वत:चे शुभंकर होण्यासाठी योगोपचाराबरोबर,रोज मराठी आणि इंग्लिश मध्ये काही तरी लिहिणे,कपडे वळत घालणे,इस्त्री करणे इत्यादी कामे ते करतात.सहा महिन्यांनी न्युरॉलॉजीस्टकडे जातात. याकाळातील सर्व बाबींचे निरीक्षण करून नोंदी करून त्याची यादी घेऊन जाऊन त्यांच्याशी चर्चा करतात.पीडी झाल्यावर  इतर उपचार न करत बसता लगेच न्युरॉलॉजीस्टनी सांगितलेली औषधे घेतली.यामुळे ही पीडी नियंत्रणात राहिला.ताठरतेसाठी व्यायाम आणि  कंपासाठी शवासन, ध्यान उपयोगी पडते.इतर शुभार्थीना घरी जाऊन मार्गदर्शन केल्याने आनंद मिळतो पीडी नसणारे लोकही मंडळासाठी काम करताना पाहून कृतज्ञता व्यक्त कारावीशी वाटते.
गोपाळ तीर्थळी यांनी पीडीसह आनंदाने राहण्यात पत्नी व इतर शुभंकरांचा वाटा खूप मोठ्ठा असल्याचे सांगत आपल्या  पत्नीला इतर शुभंकराबद्दल सांगण्यास सांगितले.शोभना तीर्थळी यांनी २०१५ च्या  स्मरणिकेतील ‘तुम्ही पण बना रोलमॉडेल’ या लेखात तीर्थळी यांनी पार्किन्सन्सला यशस्वीपणे हाताळण्यासाठी काय केले याची सविस्तर माहिती दिल्याचे सांगितले.पार्किन्सन्स मित्रमंडळ डॉक्टर,,शेजारी,हास्यक्लब सदस्य,जेष्ठ नागरिक संघ सदस्य,घरातील नोकर अशी मोठ्ठी सपोर्ट सिस्टीम पाठीशी उभी असल्याचे सांगत या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. फॉरेस्ट ऑफिसर असलेल्या यशवंत एकबोटे यांना पीडी झाल्यावर नैराश्य आले.फॅमीली डॉक्टर्,न्युरॉलॉजिस्ट यांनी धीर दिलाच पण पत्नीने यातून बाहेर काढण्यासाठी नेटाने प्रयत्न केले.टेबल पुसणे,कपबशी धुणे अशी छोटो छोटी कामे करायला लावली,आहार औषधे यांचे नियोजन केले,मुख्यत: सकारात्मक विचार करायला लावले.मसाजीस्ट,अमेरिकेत असली तरी तेथून पीडी बद्दल अभ्यास केल्याने,मार्गदर्शन करणारी ,मानसिक आधार देणारी मुलगी आणि इतर कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
शुभार्थी देसाई यांच्या वतीने वसुधा देसाई यांनी डॉक्टर्स, सोसायटीतले शेजारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.देसाई यांच्या इच्छाशक्तीचाही त्यांच्या मोठ्या दुखण्यातून बरे होण्यातील वाटा सांगितला.
पाडळकर हे चिंचवडहून आले होते.त्यांनी कुटुंबीय विशेषत: पत्नीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
घोलप यांनी नेहमीच सभांना येत असल्याचे आणि त्याचा फायदा होत असल्याचे सांगितले
.केशव महाजन यानी पत्नीबद्दल भरभरून भावना व्यक्त केल्या.देवाबद्दल असलेली श्रद्धा आनंदी राहण्यात महत्वाची असल्याचे सांगितले.कॅरम खेळण्यासाठी येणारे पार्टनर,राजकुमार आवडता नट हे ओळखून त्यांच्या सीडी भेट देणारे मित्र अशा अनेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.त्यांची पत्नी अंजलीने ते आपल्या १०३ वर्षाच्या आईची  आनंदाने सेवा करतात.मुलगी आणि नातू यांचा फोनवर आवाज ऐकूनही मानसिक समाधान मिळत असल्याचे सांगितले.
पद्मजा ताम्हणकर यांनी पार्किन्सन्स मंडळात आल्याने आनन्द वाटतो.इतरत्र संकोच वाटतो असे सांगितले.पती,मुले सुना स्तोत्रे,ओंकार द्वारे अध्यात्मिक साधनाही बळ देते.तरुण पिढीला  बेफिकीर म्हटले
जाते पण आपल्याला त्यांची वेळोवेळी मदत होत असल्याचे सांगितले.
भांगे यांनी पत्नी तसेच योगी अरविंद साहित्य,सावरकर इत्यादींच्या वाचनाने आधार मिळत असल्याचे सांगितले.
श्रद्धा भावे यांनी पती, मुले योग्य तेथे मदत करतात,काळजी घेतात. पण स्वत:ची कामे स्वत: करायला लावून  आत्मविश्वास वाढवण्यास प्रवृत्त करतात असे सांगितले.
अनिल कुलकर्णी यांनी सपोर्ट ग्रुप आणि न्युरॉलॉजीस्ट यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
रामचंद्र करमरकर यांना या गटात आणणार्‍या मित्राची, मधुसुदन शेंडे यांची आठवण झाली.त्यांच्यामुळे या कामात ओढला गेलो आणि यातून  खूप आनंद मिळत असल्याचे नमूद केले.शरच्चंद्र पटवर्धन आणि श्यामला शेंडे यांनी.त्यांनी उभे केलेले काम पुढे नेणार्‍या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या दोन तास चाललेल्या चर्चेतून प्रत्येकाला व्यक्त व्हायचं असत.यासाठी व्यासपीठ हव असत हे लक्षात आल. स्वमदत गटाबद्दल अनेकांनी कृतज्ञता व्यक्त करून अशा गटाची गरज अधोरेखित केली. अशा चर्चा वेळोवेळी ठेवणे आवश्यक आहे असे संयोजकांनाही जाणवले.
 शुभार्थी नलिनी भडभडे यांचे पती मुद्दाम सभेला आले होते त्यांनी तिळगुळ समारंभासाठी देणगी दिली.वसुधा देसाई यांनी वाढदिवसाबद्दल पेढे दिले.
सर्वाना तिळगुळ देण्यात आला. आणि चहापानानंतर प्रार्थना होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Previous article
Next article
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क