९ मार्च २०१७ सभावृत्त

Date:

Share post:

                पार्किन्सन्स मित्रमंडळात बहुसंख्येने ज्येष्ठ नागरिक आहेत.आर्थिक आवक कमी आणि आजारावरील वाढता खर्च हे लक्षात घेता आर्थिक व्यवहाराशी संबधित विषयावर व्याख्यान ठेवण्यास हरकत नाही असे वाटले.यानुसार
गुरुवार ९ मार्च रोजी  पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या सभेत
बाळकृष्ण जगताप यांचे ‘आयुष्याच्या उत्तरार्धातील गुंतवणूक’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
कार्यक्रमात सुरुवातीला मंडळाचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
पार्किन्सन्स मित्रमंडळाचे ते संस्थापक आहेत पण स्वत:ला कार्यकर्ता समजतात.ते  ८२ वर्षाचे झाले तरी तरुणाला लाजवेल असा उत्साह त्यांच्याकडे आहे.ते सायकलवर सर्वत्र जातात.सभेला न चुकता वजन काटा घेऊन येतात असे त्यांच्याबद्दल  शोभना तीर्थळी यांनी सांगितले.श्री. अजित कट्टी यानी ते संगणकाचा विविध प्रकारे वापर करायला  शिकले, इतरांनीही त्यांचा आदर्श घ्यावा असे सांगितले.
यानंतर श्री मोरेश्वर काशीकर यांनी कबीरबाग  योगोपचार पद्धतीने गोपाळ तीर्थळी या शुभार्थींवर पाठीला बेल्ट बांधण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.पीडी पेशंट स्नायूंची ताकद कमी झाल्याने पाठीत  थोडे झुकतात.यावर उपाय म्हणून बेल्ट बांधण्याचा प्रयोग ते स्वत:वरही करतात.
श्री.अजित  कट्टी यांनी वक्त्यांची ओळख करून दिली आणि मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.श्री जगताप यांनी अत्यंत सोप्या भाषेत विषय समजावून सांगितला.
साठीनंतर शारीरिक, मानसिक असमर्थता वाढते.आर्थिक आवक कमी होते.त्यामुळे पहिले महत्व आर्थिक सुरक्षिततेस द्यायला हवे. त्यानंतर value preservation ला महत्व द्यावे. हे लक्षात घेऊन चार महत्वाच्या गोष्टींद्वारे गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला.
१) सुरक्षितता -सुरक्षीततेच्या दृष्टीने राष्ट्रीयकृत बँका निवडणे चांगले.सहकारी बँका,पतपेढ्या यात त्यामानानी धोका अधिक.बाजाराची सुरक्षितताही पाहणे आवश्यक
२) लिक्विडीटी – या वयात कमवायचे नाही तर वापर करायला शिकले पाहिजे.गरज वाटली तर लगेच पैसे उपलब्ध होणे महत्वाचे.यासाठी जेथे सहा वर्षे पैशाला आपण अजिबात हात लावू शकत  नाही अशा एन.एस.सी.सारख्या ठिकाणी गुंतवणूक नको.एफ.डी.ही सेमी लिक्विड म्हणता येईल कारण येथे थोडे व्याज कमी होईल पण पैसे हवे तेंव्हा उपलब्ध होऊ शकतील.सेव्हिंग बँक खाते पूर्ण लिक्विड असते.
३)उत्पन्न ( income )- महागाई वाढते आणि गुंतवणुकीवरील व्याज दर कमी होत जात आहे.हे लक्षात घेऊन महागाईच्या  दीडपट उत्पन्न असेल अशी गुंतवणूक करावी.हे उत्पन्न  कर वजा जाता असेल हे लक्षात घ्यावे.
४) इन्कमटॅक्स – एफडी,आरडी,कंपनी डीपॉझीट यांना कर असतो.सेव्हिंग बँकेच्या रकमेत १०००० व्याजापुढे कर असतो.फायनान्शियल सल्लागाराचा यासाठी सल्ला घ्यावा.
याशिवाय फिजिकल asset मध्ये बंगला,शेती,सोने,फर्निचर हे येते.यातील दागिने,घर,फर्निचर हे पुन्हा उत्पन्न न देणारे. राहत्या घराशिवाय उत्पन्नाचे साधन म्हणून सेकंड होम घेऊ नये.त्याची व्यवस्था पाहणे उतारवयात शक्य होत नाही.फायनान्शियल asset मध्ये  बँकेतील एफडी,आरडी,पोस्ट,सिनिअर सिटीझन स्कीम्स,पीपीएफ,म्यूच्युअल फंड,शेअर्स येतात.
कराचा आणि परताव्याचा विचार करताफक्त एफडीत गुंतवणूक चालणार नाही.इक्विटी म्युच्युवल फंडात गुंतवल्यास कर भरावा लागत नाही.परतावा जास्त असतो पण रीस्क असते.इंडेक्सचा अभ्यास केल्यास ४०% तोटा ६०% नफा दिसतो. जितकी वर्षे जास्त तितका तोटा कमी, फायदा जास्त होईल .या वयात जास्त वर्षांचा विचार करता येत नाही.
महागाईच्या दीडपट उत्पन्न असण्यासाठी आणि रिस्क आणि महागाईची सांगड घालताना ७०% रिस्क नसलेली आणि ३०% रिस्क असलेली गुंतवणूक करावी.३० % गुंतवणूक करतानाही १०/१० टक्क्याचे ३ भाग करून वेगवेगळे गुंतवावे. यासाठी ज्यांचा  मार्केटचा अभ्यास आहे असा तज्ञ गुंतवणूक सल्लागार निवडावा.
नेट बँकिंग,मोबाईल बँकिंग,भीम App यांचा जरूर वापर करावा असा सल्ला दिला.यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नांना जगताप यांनी उत्तरे दिली.पार्किन्सन्ससाठी असलेल्या सवलतींची माहिती दिली.
पार्किन्सन्स पेशंटना मोफत सल्ला देण्याचे आश्वासन दिले.
त्यांचा फोन नंबर ९८५०७२९८६८
इमेल – bvjagtap@yahoo.com

Previous article
Next article

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img

Related articles

What is Parkinson’s Disease?

Parkinsons Disease is a disease of the brain when certain cells of the brain loose their function which...

पार्किन्सन्स मित्रमंडळ स्मरणिका २०२४

येथून डाऊनलोड करता येईल स्मरणिका २०२४Download

सहल – २० डिसेंबर २०२३

पार्किन्सन्स मित्रमंडळाचे सर्व सदस्य वर्षभर ज्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असतात, त्यापैकी एक म्हणजे वार्षिक सहल.   'झपूर्झा '...

विविध गुणदर्शन – ५ नोव्हेंबर २०२३

५ नोव्हेंबर २०२३ - विविध गुणदर्शन    यावर्षी प्रथमच निवारा येथे शुभार्थींच्या विविधगुणदर्शनाचा कार्यक्रम ठेवला होता.वसू देसाई ,दीपा...