शुभार्थी उमेश सलगर हे न्यूइंडिया इन्शुरन्सकंपनीत administrative ऑफिसर म्हणून नोकरी करतात कंपनीने ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०१६ ‘Vigilance Awareness weak’ म्हणून साजरा केला गेला यानिमित्त
‘public participation in promoting integrity and eradicating corruption’ या विषयावर महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्यांसाठी निबंध स्पर्धा आयोजित केली होती.या स्पर्धेत सलगर यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.मन:पूर्वक अभिनंदन!
बहुतांश पार्किन्सन्स शुभार्थी पीडी झाल्यावर नैराश्याने ग्रासतात. व्हीआरएस घेणे पसंत करतात किंवा आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून कशीबशी नोकरी करतात.पण सलगर हे मात्र आजाराचे निमित्त सांगून कोणतीही सवलत घेत नाहीत.कामाच्या निमित्याने फिरावे लागते.मध्यंतरी जमशेटपुरला जावे लागणार होते.इतर कर्मचाऱ्यांनी जाण्यास नकार दिला पण सलगर मात्र यशस्वीरीत्या काम करून आले. इतर शुभार्थीसाठी हे प्रेरणादायी आहे.
– डॉ. शोभना तीर्थळी