Thursday, November 21, 2024
Homeवृत्तांतजानेवारी 2016 - महिन्याच्या सभेचा वृत्तांत

जानेवारी 2016 – महिन्याच्या सभेचा वृत्तांत

२०१६ या  नवीन वर्षाची सुरुवात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि पार्किन्सन्स मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर मंदार जोग ( कॅनडा ) यांच्या व्याख्यानाने  झाली.समारंभास १५० शुभंकर, शुभार्थी उपस्थित होते.

पार्किन्सन्स मित्रमंडळाच्या इतिहासात दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा सहभाग वेगवेगळ्या टप्प्यावर होता.३० जून २००२ मध्ये  दिनानाथ मंगेशकर  हॉस्पिटलने पार्किन्सन्स रुग्णांसाठी मेळावा आयोजित केला होता.त्यावेळी आपापल्या पातळीवर पीडी पेशंटना एकत्रित करण्याचे काम करणारे श्री.मधुसूदन शेंडे आणि शरच्चंद्र पटवर्धन हे जुने मित्र  भेटले.आणि त्यांचे एकत्रित काम सुरु झाले.
२००८  मध्ये पार्किन्सन्स मित्रमंडळाने जागतिक पार्किन्सन्स दिनानिमित्त दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये  मेळावा आयोजित केला.त्यावेळी उत्तम प्रतीसाद मिळाला, अनेक कार्यकर्ते मिळाले आणि मंडळाच्या कामाचा वेग वाढला.आणि आता २०१६ मध्ये हॉस्पिटल आणि मंडळ या दोघांनी एकत्रित कार्यक्रमाचे आयोजन केले आहे’Together we move better. ‘
 कार्यक्रमाची सुरुवात ‘सं गच्छ्यध्वं सं वदध्वं’ या ऋग्वेदातील प्रार्थनेने झाली.
यानंतर डॉक्टर मंदार जोग,दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या न्युरॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉक्टर राहुल कुलकर्णी,आणि पार्किन्सन्स मित्रमंडळाचे संस्थापक सदस्य शरच्चंद्र पटवर्धन यांचा श्री करमरकर यांनी पुष्प गुछ्य देऊन सत्कार केला. शरच्चंद्र पटवर्धन यांनी प्रास्ताविक केले.डॉक्टर राहुल कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यावर डॉक्टर मंदार जोग यांना व्याख्यानासाठी पाचारण करण्यात आले.शोभना तीर्थळी यांनी त्यांची ओळख करून दिली.
  डॉक्टर मंदार जोग (  M.D.,F.R.C.P.C. )कॅनडा येथील नॅशनल पार्किन्सन्स फाउंडेशन सेंटर ऑफ एक्स्लन्स्,इन पर्किन्सन्स डिसीज अँड मुव्हमेंट डिसॉर्डर् प्रोग्रॅम,हेल्थ सायन्स सेंटर.या संस्थेचे डायरेक्टर अहेत.वेस्टर्न युनिव्हर्सिटी मध्ये न्युरॉलॉजीचे प्रोफेसर आहेत.कॅलिफोर्निया येथिल स्टँडफर्ड रिसर्च इन्स्टिट्युट येथेही व्हिजिटींग प्रोफेसर आहेत.
   टोरांटो येथे त्यांचे  न्युरॉलॉजिचे शिक्षण झले.डॉक्टर अँथनी लँग यांच्या बरोबर मुव्ह्मेंट डिसऑर्डर मध्ये फेलोशिप पुर्ण केली.एम.आय.टी.मध्ये कॉम्प्युटेशनल न्युरोसायन्समध्ये पोस्ट्डॉक्टरल फेलोशिप पुर्ण केली.त्यांची स्वतंत्र क्लिनिकल प्रॅक्टीस आहेच शिवाय पदव्युत्तर,पीएचडी,आणि पोस्ट डॉक्टरल फेलोच्या संशोधनात ते मार्गदर्शन करतात.
त्यांची दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.Basel ganglia & their role in movement disorder या विषयातील त्यांचे शेकडो शोध  निबंध  प्रसिद्ध झालेले आहेत.
मेडिकल टेक्नोलॉजीमधील पेटंटस त्याना मिळालेली आहेत.ते फक्त पेटंट घेऊन थांबले नाहीत तर न्युरो टेक्नोलॉजीमधील कंपन्याही कंपन्यांचीही त्यांनी स्थापना केली आहे.
डॉक्टर जोग विविध देशात व्याख्याने देतात.तसेच कार्यशाळाही घेतात.
या बहुआयामी कार्यामुळे त्याना संशोधन,अध्यापन,नवनिर्मिती साठी विविध मान्यवर संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत.
त्यांनी आपल्या व्याख्यानात सुरुवातीला पार्किन्सन्स होण्याची शक्यता कोणकोणत्या बाबीमुळे वाढू शकते हे सांगितले.डीबीएस सर्जरीबाबत विविध स्लाईड्सद्वारे माहिती सांगितली.संशोधनावस्थेतील उपचारांचा आढावा घेतला.त्यांच्या अत्यंत सोप्या शैलीतील ओघवत्या भाषणामुळे एक तास कसा गेला समजला नाही.
यानंतर श्रोत्यांच्या अनेक प्रश्नाना त्यांनी उत्तरे दिली.
(डॉक्टर मंदार जोग यांचे संपूर्ण भाषण वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.)
आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाचे सूत्र संचालन शोभना तीर्थळी यांनी केले.
दिनानाथ हॉस्पिटलने सर्वांसाठी चहा बिस्किटाची व्यवस्था केली होती.येथे सर्वाना एकमेकांशी चर्चा करण्यास ओळखी करून घेण्यास अवधी मिळाला.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

मनीषा जोशी on स्वमदतगट
शोभना तीर्थळी on एस एम एस वाढा हो..!! –
शोभना तीर्थाली on ८ जानेवारी २०१८ सभावृत्त
ज्ञानेश्वर पवार दि नु इंडिया आश्यूरन्स कंपनी सातारा शाखा on क्षण भारावलेले – ६ – डॉ. शोभना तीर्थळी
शोभना तीर्थळी on आमच्याबद्दल
शोभना तीर्थळी on स्मरणिका
Vishal T Abnave on संपर्क
Shobhana Tirthali on संपर्क
Pradip Balsaraf on संपर्क
shobhana Tirthali on संपर्क
Surendra Verma on संपर्क
शोभना तीर्थळी on संपर्क
शोभना तीर्थळी on पार्किन्सन्सबद्दल
मधुकर सोनवणे on पार्किन्सन्सबद्दल
avinah d dharmadhikari on संपर्क
shobhana tirthali on Ganesh Paintings by Bhushana Bhise
शोभना तीर्थळी on संपर्क
shirish d. harankhedkar on संपर्क
Abdulkadar Mulla on संपर्क